मेघालयाच्या मुख्य सचिवांचा उजबेकिस्तानमध्ये मृत्यू   

शिलाँग : मेघालयाचे मुख्य सचिव सय्यद मोहम्मद ए राजी यांचा उजबेकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह हॉटेलच्या एका खोलीत सापडला होता. ते खासगी दौर्‍यासाठी उजबेकिस्तानला आले होते. 
 
सय्यद मोहम्मद ए राजी हे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे अधिकारी असून २०२१ पासून मेघालयाचे मुख्य सचिवपदी कार्यरत होते. ४ एप्रिल रोजी ते उजबेकिस्तानच्या बुखारा शहरात खासगी दौर्‍यावर गेले होते. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, सय्यद राजी यांना सोमवारी सकाळी फोन केला होता. पण, त्यांनी उचलला नाही. हॉटेल कर्मचार्‍यांनी खोलीचे दार तोडले. आता पाहिले तर त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.  मेघालयाचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी राजी यांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. 

Related Articles